* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

19 January 2016

㇌गणोजाची श्रीमहालक्ष्मी

गणोजाची श्रीमहालक्ष्मी


         भातकुली तालुक्यातील गणोजा येथे श्रीमहालक्ष्मीचे मंदिर आहे. येथील श्रीमहालक्ष्मीची काळ्या पाषाणाची मूर्ती कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मीचे प्रतिरूप मानले जाते . त्यामुळेच या देवीला भाविक करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी संबोधतात. नवरात्सवात व मार्गशीर्ष पौर्णिमेला यात्रोत्सव असतो. यादरम्यान विदर्भासह राज्याच्या अनेक भागातून मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. यानिमित्त मंदिरावर देखणी विद्युत रोषणाई केली जाते. देवीला सोन्याचा अलंकृत मुखवटा व मढविलेले दागदागिने चढविले जातात. येथील श्रीमहालक्ष्मी हजारो भाविकांची कुळदैवत असून श्रद्धास्थान आहे. 
         श्रीमहालक्ष्मीची मूर्ती अखंड काळ्या पाषाणाची असून साधारणतः सव्वा दोन फुट उंचीची आहे. ती सिंहावर आरूढ असून चतुर्भुज आहे. तिच्या हातात त्रिशूल, ढाल, गदा व पद्म आहे. यात्रोत्सव दरम्यान भागवत कथेसह काकड आरती, भारुड, हरिपाठ, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तर, नवमीला रात्री होमहवन करण्यात येते. नवरात्रात परिसरातील अनेक भाविक सकाळी पायदळ देवीच्या दर्शनाला जातात. अष्ठमिला महाआरती करून सुखामेव्याचा प्रसाद वितरीत करतात.  
छायाचित्र : 






 </marquee>


1 comment: