"गाडगेबाबाच्या" जयघोषाने श्रीक्षेत्र ऋणमोचनचा आसमंत दुमदुमला!
* अन्न, वस्त्रदान सोहळा
* मुदगलेश्वराच्या दर्शनासाठी उसळला जनसागर
आज दिनांक ७ फेब्रुवारी पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र ऋणमोचन येथे शेकडो अंध, अपंग निराधारांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील अन्न व वस्त्रदान अनेक दानशुरांच्या हस्ते करण्यात आले. हि परंपरा बाबांनी १९०७ साली ऋणमोचन येथे सुरु केली होती. ती अखंड सुरु आहे. मुंबईच्या लोयनेस क्लबच्या पन्ना म्याडम यांनी रुग्णवाहिका भेट दिली. यावेळी भाविकांच्या "गाडगेबाबा की जय" या जयघोषाने ऋणमोचनचा आसमंत दुमदुमला होता.
विदर्भासह राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक आज पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने श्री. मुदगलेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्याचा जनसागर आज येथे उसळला होता. रथसप्तमीपर्यंत ही यात्रा सुरु राहणार आहे. गाडगेबाबा मिशनचे बापूसाहेब देशमुख यांनी निवेदन केले.
क्षणचित्रे…
 |
वस्त्रदान सोहळा |
 |
पूर्ण नदीला पाणी नसल्याने झऱ्याचे पाणी शिंपडतांना भाविक |
 |
मोफत मिळालेली रुग्णवाहिका |
 |
मुदगलेश्वराचे शिवलिंग |
No comments:
Post a Comment