आज दिनांक 12 मार्चला सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वासेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांनी वृक्षपूजन करून शालेय परिसरातील केरकचरा गोळा करून कचर्याची होळी केली. गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम अखंड सुरु आहे. सन व संस्कृतीला निगडीत हा उपक्रम असल्याने विद्यार्थी स्वयमस्फूर्तीने, मोठया उत्साहाने सहभागी होतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वृक्षाचे महत्व व संवर्धन करण्याची जाणीव होते. याशिवाय शाळेतील विद्यार्थी रंगपंचमीला, धुलीवंदनाच्या दिवशी रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरतात. आज विद्यार्थ्यांना एकमेकांना रंग लावण्याचा मोह आवरता आला नाही त्यांनी शाळेतच नैसर्गिक रंग लाऊन धुलीवन्दनाचा आनंद घेतला. अशाप्रकारे आजचा हा सोहळा उत्साहात झाला.

दिनांक 13 मार्च 2017 च्या दैनिक सकाळमधील प्रकाशित बातमी
No comments:
Post a Comment