* मी विनायक लकडे, स.शि. जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, कुंड सर्जापुर. पंचायत समिती : अमरावती, जिल्हा : अमरावती. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in * संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

शिक्षकांचे व्यासपीठ

माझ्या तमाम गुरुमाऊलीचे "शैक्षणिक दालन" या संकेतस्थळावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे.

31 December 2021

शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे विमोचन



शिक्षक संघटनांच्या दिनदर्शिकेचा उपक्रम कौतुकास्पद

शिक्षणाधिकारी ई. झेड. खान: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दिनदर्शीकेचे विमोचन

 


अमरावती, दि.३०: शिक्षक संघटनांच्या दिनदर्शिकेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी ई. झेड. खान यांनी केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे विमोचन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी सर्व शिक्षकांना नविन वर्षाच्या शुभेच्छादेखील दिल्या. प्रमुख उपस्थिती शिक्षण विस्तार अधिकारी श्री. खांडेकर, दिलीप तानोलकर, अशोक रामटेके, सौ. सोनोने, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, शिक्षक परिषदेचे राज्यउपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुनिल केने यांची होती.

      कार्यक्रमाला जिल्हाकार्याध्यक्ष विनायक लकडे, जिल्हाकार्यवाह रवी घवळे, जिल्हाकोषाध्यक्ष प्रवीण कडू, जिल्हाप्रसिद्धीप्रमुख प्रभुदास बिसंदरे, जिल्हासंघटक गजानन मोरे, शैलेश चौकसे, राजेश घवळे, नरेंद्र ठाकूर, गजानन ठाकरे, नारायण अतकरे, मोहन जामनेकर, नंदकिशोर पवार, संतोष ठाकरे, विलास निर्मळ, अजय राऊत, गजानन जाधव,संजय मोदी, विलास चोखंडे,  किशोर हेडाऊ, युवराज अढाऊ, संदीप अकोलकर,संजय गंगराडे, सुदर्शन चामलोट, प्रकाश काळे, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सविता गौरखेडे , प्रगती पुंड, स्वाती हंतोडकर, सुषमा दळवी, देवकी अवघड, लक्ष्मी माकोडे, रजनी रघुवंशी आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे संचालन प्रविण कडू यांनी केले तर, उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार रवि घवळे यांनी मानले.

--------------------------------------

No comments:

Post a Comment