महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

09 September 2018

भातकुली येथील आशीर्वाद ग्रुपने केला " मायभूमितील " आदर्श    शिक्षकांचा सहृदय सत्कार...

* शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञता केली व्यक्त

* आदर्श शिक्षकांच्या कार्यकर्तुत्वाचे केले कौतुक

-----------------------------------------------
          भातकुली :  शिक्षक दिनाचे औचित्यसाधून येथील आशीर्वाद ग्रुपच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व मायभूमित जन्मलेल्या शिक्षकांचा सहृदय सत्कार येथील छोगालाल राठी गुरुकुल विद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्याच्याविषयी उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त करून त्याच्या कार्यकर्तुत्वाचे कौतुक केले. 
       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. कृष्णराव पवार होते. प्रमुख उपस्थिती गुरुकुल शिक्षण संस्थेचे सचिव श्री.श्रीकांत राठी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.बद्रीनाथ भोपसे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. जमदाडे, रायसोनीचे माजी संचालक श्री. रतन बगाडे, आदिवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता शिंदे, आशिर्वाद ग्रुपचे संचालक श्री.मनोहर बुध, मुख्याध्यापक श्री. गजानन लेंडे , मुख्याध्यापिका श्रीमती पन्ना बोरा, मीनाक्षी डहाळे यांची होती.
      शिक्षण क्षेत्रात अलौकिक व उल्लेखनीय कार्य करणारे व भातकुलीच्या मायभूमित जन्मलेले गजानन कासमपुरे, विनायक लकडे, संगीता येवतीकर, उमेश चुनकीकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच उच्च विद्याभूषित असलेले प्रा.राजेश देशमुख, रवी सदांशीव यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन तर याच मायभूमितील संदीप धांडे,अशोक पवार, गणेश पवार, दादाराव उमक, प्रवीण खरबडे या शिक्षकांचादेखील शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय जडावबाई राठी कन्या विद्यालय,महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, आदिवासी आश्रमशाळा, जि.प.मुलांची शाळा, जि.प.कन्या शाळा,जि.प.उर्दु शाळा, राष्ट्रीय एकता उर्दु हायस्कूल,आदर्श इंग्लिश प्रायमरी स्कूल, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शलाका विद्यामंदिर,निंभा विद्यालय निंभा येथिल, मुख्याध्यापक व शिक्षकांचासुध्दा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
*यावेळी  कुलस्वामिनी  शिक्षण संस्था व माऊली कंन्ट्क्शन च्या वतीने 10 फुटाचा हार शिक्षकांना घालुन शिक्षकाप्रती कुतज्ञता व्यक्त आली.*
     यावेळी सत्कारमुर्ती  राजेश देशमुख, विनायक लकडे, रवी सदांशीव, उमेश चुनकीकर, संगीता येवतीकर यांनी सत्काराला उत्तर दिले.
      यावेळी प्रमुख अतिथी श्रीकांत राठी, श्री. जमदाडे, सुभाष चतुर्भुज यांची समयोचित भाषणे झाली.
      प्रास्ताविक सुरेश ठाकुर यांनी केले. संचालन राहुल दहिकर यांनी केले तर, आभार श्री. पानझाडे सर यांनी  मानले.
      वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
      कार्यक्रमाला छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय, जडावबाई राठी विद्यालय, आदर्श इंग्लिश स्कुल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बुध, हर्षद वाचासुंदर, देशमुख, गजानन बुऱ्हाडे, रवींद्र टापरे, संजय झासकर,संतोष शिंदे, रवींद्र खांडेकर यांनी परिश्रम घेतले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली
-----------------------------------------------
   

काही क्षणचित्रे....





















No comments:

Post a Comment