महाराष्ट्रातील तमाम गुरुमाऊलीचे हार्दिक हार्दिक स्वागत. माझ्या ब्लॉगची लिंक आहे. http://shaikshanikdalan.blogspot.in संपर्क : 9822700402, WhatsApp : 9403312555, E-mail : vinayaklakade72@gmail.com

01 March 2016

चला तंत्रस्नेही बनूया, प्रगत महाराष्ट्र घडऊ या

तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा




          प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमा अंतर्गत मागणीनुसार प्रशिक्षण या धोरणानुसार राज्यात सर्वत्र तंत्रस्नेही शिक्षकांची कार्यशाळा सुरु आहे. त्याला प्रचंड प्रतिसाददेखील मिळत असल्याचे दिसून येत आहे. या प्रशिक्षणासाठी रोज अनेक शिक्षक नोंदणी करीत आहेत. अमरावती जिल्ह्यातदेखील शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती  व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आज दिनांक १ मार्चला  तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेच्या दुसर्या टप्प्याचे  उदघाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या जेष्ठ अधिव्याख्याता मा. श्रीमती रत्नमालाताई खडके यांच्या हस्ते झाले. यावेळी तंत्रस्नेही मार्गदर्शक मनोज चोरपगार, सतीश नांदणे यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेत  जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक  सहभागी झाले आहे. 
       दोन दिवसीय कार्यशाळेत आज पहिल्या दिवशी सतीश नांदणे सरांनी G mail, Google plus, मोबाईल Laptop ला कसा अट्याच करावा याविषयी माहिती दिली. त्यानंतर मनोज चोरपगार सरांनी Whats App विषयी तर चंद्रशेखर रामटेके यांनी digital school व ई लर्निंग याविषयी माहिती दिली. विनोद राठोड सरांनी विडीओ कसा तयार करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अशाप्रकारे आजचा पहिला दिवस काहीतरी नवीन शिकून गेला.
              

कार्यशाळेतील काही क्षणचित्रे   


मार्गदर्शन करतांना मनोज चोरपगार 


मार्गदर्शन करतांना मा. श्रीमती रत्नमालाताई खडके 

कार्यशाळेत उपस्थित शिक्षक 


प्रात्यक्षिक करतांना शिक्षक मंडळी 


शंकेचे समाधान करतांना शिक्षक बंधु 


पहिल्या कार्यशाळेला मा उपशिक्षणाधिकारी डॉ. जयश्रीताई राउत यांनी भेट दिली.   










ब्लॉग कसा बनवायचा याविषयी ऑनलाईन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करतांना
विनायक लकडे 



प्रतिक्रिया देतांना श्रीमती सोळंके 



प्रतिक्रिया देतांना सचिन अवघड 






उदयाला कार्यशाळेचा दुसरा दिवस आहे. गुगुल फॉर्म, ब्लॉग, पीपीटी  आदी महत्वपूर्ण बाबीविषयी माहिती मिळणार आहे.  

1 comment:

  1. http://app.appsgeyser.com/Mazi%20Bhatkuli

    http://www.appsgeyser.com/2881769

    ReplyDelete